मुंबई

धनंजय मुंडे राजीनामा प्रकरण: शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

पूजा विचारे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील लागलेल्या बलात्काराच्या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी शरद पवार यांनी एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्यानं धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

तसंच धनंजय मुंडे प्रकरणाची सर्व बाजूने माहिती घेतली. या प्रकरणी खोलवर जाऊन तपास करण्याची गरज असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं आहे. तर मी कालंच सांगितलं आहे की ही प्रश्न गंभीर आहे. महिलेने केलेल्या तक्रारीचं स्वरुप गंभीर आहे. याबाबतीत सर्व मिळून निर्णय घेण्यात येईल. काल या गोष्टीवर सविस्तर विचारविनिमय केला असल्याचं शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

तसंच या संपूर्ण प्रकरणाची सत्यता जाणून घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले.  यावेळी शरद पवार यांना धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नसल्याचंही पवार म्हणालेत.  

संपूर्ण पोलिस चौकशी झाल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं पक्षाच्या बैठकीत ठरलं असल्याची माहिती ही शरद पवार यांनी दिली आहे.

ncp chief Sharad Pawar reaction dhananjay munde Resigned front of media

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT